शेतक-यांच्या उत्पादित शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा. हंगामात बाजारपेठेत शेतीमालाची आवक एकदम वाढल्यास शेतीमालाचे दर कमी होतात त्यामुळे शेतक-यांचे नुकसान टाळण्यासाठी बाजारभाव कमी झाल्यास शेतक-यांना शेतीमालाची विक्री न करता शेतीमाल तारण ठेवून अकलूज बाजार समिती स्वनिधीतून द.सा.द.शे. ६ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते.