कृषि उत्पन्न बाजार समिती, अकलूज

शेतक-यांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळावा,शेतमालाच्या विक्रीमध्ये फसवणूक होऊ नये या उदात्त हेतूने कै.स.म.शंकरराव मोहिते-पाटील यांनी २ मार्च १९५० रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. ७५ वर्षापूर्वी सुरू केलेली बाजार समिती महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून ओळखली जाते. बाजार समितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण माळशिरस तालुका असून आसपासच्या तालुक्यातील शेतकरीही खरेदी विक्रीसाठी या बाजार समितीमध्ये येत असतात. बाजार समितीचे मुख्य यार्ड अकलूज असून दुय्यम बाजारपेठ नातेपुते, माळशिरस,वेळापूर, पिलीव, शिंदेवाडी या ठिकाणी आहे. बाजार समितीच्या मालकीची जमीन अकलूज ४५ एकर, नातेपुते १९ एकर, शिंदेवाडी ३ एकर, माळशिरस ३ एकर अशी एकूण ७० एकर आहे.

बदलत्या काळाबरोबर विविध क्षेत्रात होत असलेल्या बदलाप्रमाणे आधुनिकीकरणाचे धोरण अवलंबून आधुनिक उपक्रम हाती घेत शेतक-यांच्या व तत्सम बाजार घटकांच्या सोयीसाठी बाजार समिती अकलूज येथे भूसार मार्केट, फळेभाजीपाला मार्केट, डाळींब मार्केट, कांदा मार्केट, केळी मार्केट, जनावरे बाजार, शेळ्यामेंढ्या बाजार, कातडी बाजार,कोंबड्या अंडी बाजार, दिवाळी पाडव्याच्या दिवशी घोडेबाजार, दुय्यम बाजारपेठ नातेपुते येथे भूसार मार्केट, गुळ मार्केट, शेळ्यामेंढ्या बाजार त्याचबरोबर अनेक मुलभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. बाजार समितीच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत या बाजार समितीचा महाराष्ट्रामध्ये ८ वा क्रमांक आलेला आहे.

पायाभूत सुविधा

डाळींब मार्केट गांडूळ खत प्रकल्प स्वच्छतागृह
फळेभाजीपाला मार्केट रेशीम कोष केंद्र अंतर्गत रस्ते
कांदा मार्केट शेतमाल तारण कर्ज योजना गटारे
भूसार मार्केट वृक्षारोपन व संवर्धन वाहनतळ
गुळ मार्केट बागबगीच्या विकास आराखडा
जनावरे बाजार कार्यालय आंबा महोत्सव
शेळ्यामेंढ्या बाजार हमाल मापाडी भवन सोलर सिस्टीम
कातडी बाजार शेतकरी निवास स्ट्रीट लाईट
कोंबड्या अंडी बाजार हमीभाव खरेदी केंद्र शासकीय अनुदान योजना
पेट्रोलपंप/सी.एन.जी./इलेक्ट्रीकल चार्जींग स्टेशन चर्चासत्र व विविध पिकाचे परिसंवाद उच्चशिक्षित प्रशिक्षित कर्मचारी वर्ग
सु.मा.गाळे ई-नाम अंतर्गत खरेदी लेखापरीक्षण
घोडे यात्रा सेलहॉल/गोडावून  
आर.ओ.वॉटर लिलाव कट्टे  

नियोजित उपक्रम

कोल्ड स्टोरेज(अकलूज,नातेपुते) पेट्रोलपंप(नातेपुते)
सु.मा.गाळे(अकलूज,नातेपुते,माळशिरस) सुसज्ज शेतकरी भवन
मल्टीपर्पज हॉल शिवभोजन थाळी
कांदा साठवणूक सेलहॉल इको-टॉयलेट
केळी निर्यात सुविधा केंद्र बेदाणा मार्केट

संचालक मंडळ

सन २०२३-२४ ते २०२७-२८ या कालावधीसाठी सभापती मा.श्री.मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील व उपसभापती मा.श्री.बापूराव पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे दिवसेंदिवस शेतक-यांच्या सेवासुविधा व बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आस्थापना

बाजार समितीचा आकृतीबंध ३६ कर्मचा-यांचा असून १८ कर्मचारी कायम आहेत. आस्थापना खर्चही विहित मर्यादेत आहे.

विकास आराखडा

बाजार समितीचे मुख्य व उपबाजाराचे ७० एकर क्षेत्रावर शेतमाल अनुशंगिक भविष्यकालीन गरजांचा विचार करून विकास आराखडा तयार केलेला आहे.

लेखापरिक्षण व आर्थिक स्थिती

बाजार समितीस सतत अ वर्ग ऑडीट शेरा मिळालेला असून बाजार समितीच्या स्थापनेपासून उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ होत आलेली आहे. प्रत्येक वर्षी बाजार समितीची बहुतांशी विकास कामे स्वत:च्या फंडातून केली जातात.या वर्षीचा वाढावा १ कोटी १६ लाख रूपये झालेला आहे. बाजार समितीची गतवर्षी ४०० कोटी उलाढाल झालेली आहे.

समारोप

बाजार समितीचे दैदिप्यमान यशामध्ये मा.श्री.विजयसिंह मोहिते-पाटील,मा.उपमुख्यमंत्री, मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील, मा.आ.श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील, मा.खा.श्री.धैर्यशील मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन व योगदान मोठे आहे.

शेतकरी,व्यापारी,ग्राहक,विक्रेता तसेच तत्सम बाजार घटक,सुशिक्षित बेरोजगार आदींच्या आर्थिक,सामाजिक विकासासाठी प्रयत्न केला असून आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून बाजार समितीकडे पाहीले जाते. बदलत्या काळाची पावले ओळखून बाजार समितीच्या संचालक मंडळाने बाजार घटकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देवून विश्वास प्राप्त केला आहे.