मका व तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर बाजारपेठेमध्ये मका व तुरीचे दर पडलेले असतात अशा वेळी शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळण्याकरीता शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावामध्ये शेतक-यांची मका व तुर हमीभावाने बाजार समितीमध्ये खरेदी करून सदर मालाचे पेमेंट शेतक-यांच्या बँक खात्यावर १५ दिवसामध्ये जमा केले जाते.