आंबा महोत्सवामध्ये विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांची साखळी वगळून आंबा उत्पादक शेतक-यांकडून थेट ग्राहकांना माफक दरात आंब्याची विक्री केली जाते. त्यामुळे आंबा उत्पादकांना चांगले मार्केट उपलब्ध होते.आंबा उत्पादकांचे हित लक्षात घेता बाजार समितीने वेळोवेळी आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे.