शेतक-यांना केळी,ऊस तसेच इतर पिकांचे किड व्यवस्थापन व नियंत्रण,पिकांसाठी इषटतम आर्दता पातळी सुनिश्चित करण्यासाठी ठिबक सिंचन करणे,स्थानिक हवामान आणि मातीच्या परिस्थितीला अनुकूल असलेली पिके निवडणे,नफा असलेल्या पिकांसाठी विशिष्ट बाजारपेठ निवडणे,तसेच मर्यादित असणा-या संसाधनामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे. यासंबंधित मार्गदर्शन करण्याकरीता विविध पिकांचे परिसंवाद/चर्चासत्रांचे आयोजन बाजार समितीव्दारे केले जाते.