कृषि उत्पन्न बाजार समिती,अकलूज व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डाळींब पीक चर्चासत्र शुक्रवार दिनांक २७ रोजी बाजार समितीचे सभापती मा.श्री.मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सदर डाळींब पीक चर्चासत्रामध्ये मा.श्री.डॉ.निलेश गायकवाड,शास्त्ज डाळींब संशोधन केंद्र,सोलापूर यांचे डाळींब लागवड व व्यवस्थापन तसेच डाळींब काढणी पश्चात तंत्रज्ञान व प्रोसेसिंग या विषयावरती व मा.श्री.अमोल भोंग, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रजञान संस्था,पुणे यांचे व्याख्यान झाले.
जागतिक स्तरावर भारत आघाडीचा निर्यातदार असून त्यामुळे डाळींब फळांना आकर्षक रंग, गोडवा, उत्तम चवासाठी कराव्या लागणा-या उपाययोजना, हवामान बदलामुळे उत्पादनावर होणा-या परिणामासाठी योग्य तांत्रिक नियोजनाची गरज, डाळींब पीक लागण पध्दत खताचा योग्य वापर, विविध रोगांवरती उपाययोजना, पाणीपध्दती, निर्यातवृध्दीसाठीचे उपाय सुगीपश्चात प्रोसेसिंग, डाळींब प्रक्रीयापासून डाळींब दाणे, रस, जॅम, स्कॅश, सिरप, डाळींबाच्या सालीपासून तयार होणारी सौंदर्य प्रसाधने, डाळींबाच्या बीयापासून तेलनिर्मिती असे अनेक लघुउद्योग तयार करण्यासाठी शेतक-यांनी पुढे यावे तसेच शेती बरोबर उद्योजक व्हावे असे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक बाबुराव कदम, आप्पासाहेब रूपनवर, शिवाजी चव्हाण, महावीर गांधी तसेच शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डाळींब पिकाबाबतच्या शंका व अडचणीबाबत विचारलेल्या प्रश्नांना शास्त्रज्ञाने समर्पक उत्तरे देवून शंकेचे निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आप्पासाहेब रूपनवर यांनी मानले.
